। पनवेल । वार्ताहर ।
पनवेलमधील एका व्यक्तीच्या व्हॉटसअपवर अँक्सीस बॅक अधिकार्याचे बनावट आयडी कार्ड पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. यावेळी या व्यक्तीचे नेट बॅकींग हॅक करून 14 लाखांचे वयक्तीक कर्ज करून त्यांच्या बँक खात्यात जमा झाले. यानंतर हे कर्ज निष्क्रिय करण्याच्या बहाण्याने पीडित व्यक्तीच्या खात्यात जमा झालेली 14 लाखांची रक्कम इतर खात्यात वळवुन त्यांची फसवणुक केल्याप्रकरणी त्यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पनवेलच्या सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली पाटील व पथकाने पीडित व्यक्तीचे बॅक व्यवहार विश्लेषण आणि क्लिष्ट तांत्रिक विश्लेषन केले असता गुन्ह्यातील संशयित आरोपीत टोळी ही दिल्ली येथुन अँक्सीस बॅक वयक्तीक कर्जाची फसवणूक करीत असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपीतांबाबत तपास करत या गुन्ह्यातील एका आरोपीला दिल्ली येथुन सापळा रचून शिताफिने अटक करण्यात आली. गुन्ह्यातील तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.