| पनवेल | प्रतिनिधी |
फार्मासिस्ट म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रामेश्वर नारायण पवळ रा. अकोला आणि कैलास अर्जुन मुंडे रा. बीड यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपी कैलास मुंडे याला अटक करण्यात आली आहे. तक्रारदार यांच्या पतीकडून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात फार्मसिस्ट म्हणून नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून दोघांनी सहा लाख रुपये घेतले आणि त्यांना नोकरी लावून दिली नाही. यावेळी तक्रारदार यांनी पैसे परत मागितले असता ते परत न करता त्यांची फसवणूक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कैलास मुंडे याला अटक केली. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार करत आहेत.
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
