। कर्जत । प्रतिनिधी ।
कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालय, माजी आमदार स्वर्गीय तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ज्योवीस आयुर्वेद व नारी सामाजिक संस्था दादर यांच्या सहकार्याने उन्नत भारत अभियानांतर्गत मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबीर आणि मोफत औषधे वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 144 जणांनी तपासणी करून घेतली.
डॉ. राज सातपुते यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यांनतर फीत कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश सुर्वे, झुलकरनैन डाभिया, डॉ. ज्योती सातपुते, मनीषा सुर्वे, डॉ. मणी शंकर गुप्ता, डॉ. विश्वनाथ काळवर, डॉ. अमोल चांदेकर, डॉ. निलोफर खान आदी उपस्थित होते. याप्रसंगी कर्जत, वदप, लाडिवली, वेनगाव, लाखरन, दहीवली, आणि तिवरे येथील ग्रामस्थांनी शिबिरात 144 जणांनी तपासणी करून घेतली. यामध्ये निदान आणि विविध आयुर्वेद उपचार पद्धतींचा वापर करून उपचार करण्यात आले आणि औषधे मोफत वाटप करण्यात आली.