| पेण | प्रतिनिधी |
पेण येथील डॉ. सोनाली शेट्ये यांच्या माऊली नर्सिंग होममध्ये दर शनिवारी दुपारी 2 ते 4 गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाच्या कॅन्सरची तपासणी मोफत केली जाते. त्या मोफत तपासणीचा फायदा जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा, असे आवाहन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सोनाली शेट्ये यांनी कृषीवलशी बोलताना केले. त्यांनी सांगितले की, आज मोठ्या प्रमाणात गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर महिलांमध्ये उद्भवत आहे. वेळेत तपासणी होऊन निदान झाल्यास कित्येक माता-भगिनींचा जीव वाचू शकतो. आजच्या घडीला ग्रामीण भागामध्ये गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाच्या कॅन्सरबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीनेदेखील आम्ही पावले उचलत आहोत. आज ही तपासणी महागडी असल्याने कित्येक महिला तपासणी करत नाहीत. ही बाब लक्षात घेऊनच आम्ही माऊली नर्सिंग होममध्ये मोफत तपासणी दर शनिवारी ठेवली आहे. तरी, या मोफत तपासणीचा लाभ घेऊन महिलांनी आपले आरोग्य जपावे.