। पाली । प्रतिनिधी ।
पाली, सुधागडातील पंचशील नगर पाच्छापूर येथे बुधवारी (दि.14) मकर संक्राती दिनी रवींद्र पाटणी फॅमिली चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने आणि आयोजक बौद्ध विकास मंडळ पाच्छापूर मुंबई मध्यवर्ती कमिटी व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून पाच्छापूर दर्यागाव पंचक्रोशीतील गरीब व गरजू रहिवाशांना मोफत धान्य आणि ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम पंचशील नगर पाच्छापूर येथे पार पडला. यामध्ये जवळपास दीडशेहून अधिक कुटुंबांना धान्य किट व ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
रवींद्र पाटणी फॅमिली चॅरीटेबल ट्रस्ट आणि बौद्ध विकास मंडळ पाच्छापूर मुंबई मध्यवर्ती कमिटी व ग्रामस्थ हे 25 वर्षांपासून दरवर्षी हा कार्यक्रम पंचशील नगर पाच्छापूर दर्यागाव या ठिकाणी राबवित असतात. राजेंद्र महाडिक हे मंडळाच्या मार्फत पाच्छापूर दर्यागाव येथील नागरिकांना विविध प्रकारे सेवा देत असतात. मोफत धान्य वाटप ब्लॅकेट वाटप, मोफत आरोग्य तपासणी शिबीर, नेत्रचिकित्स शिबीर, चष्मे वाटप, शालेय विध्यार्थी यांना शालेय वस्तूंचे वाटप असे विविध कार्यक्रम सातत्याने राबवित असतात.
हा कार्यक्रम राबविण्याकरिता बौद्ध विकास मंडळ पाच्छापूर मुंबई मध्यवर्ती कमिटी व ग्रामस्थ कमिटीचे प्रमुख मार्गदर्शक व सल्लगार सुरेंद्र विश्वनाथ महाडिक यांचे मोलाचे सहकार्य आणि साथ असते. या कार्यक्रमासाठी सचिव राकेश महाडिक, कोषाध्यक्ष शरद महाडिक, उपाध्यक्ष मधुकर महाडिक, संदीप डिंगळे, सिद्धांत गायकवाड, दिलीप डिंगळे, सुनील खांबे, नागू वारा, सुजाता महाडिक, राजेश्री महाडिक, अमिता डिंगळे, सुगंधा डिंगळे, लिंबाबाई महाडिक, मीरा भालेराव यांनी अथक मेहेनत घेतली. कार्यक्रमाला रवींद्र पाटणी फॅमिली चॅरीटेबल ट्रस्टतर्फे डि.के. जैन, डॉ. मोहनसिंह शेखावत, संतोष सैतावडेकर, सुधागड तालुक्यातील मान्यवर निशांत पवार, अॅड. सुशील गायकवाड, अक्षय गायकवाड, विवेक रोकडे उपस्थित होते.
गरजूंना मोफत धान्य, ब्लॅंकेट वाटप
