शेकापचा स्त्युत्य उपक्रम
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गेल्या वर्षात नैसर्गिक कारणामुळे समुद्रातील मासेमारीवर परिणाम झाला आहे. जवळ-जवळ नोव्हेंबर महिन्या पासून कोळी बांधव मासेमारीसाठी समुद्रात जाऊन ही बर्याचदा त्यांना निराश होऊन परतावे लागले. कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ आली हे दुःख शेतकरी कामगार पक्षाने जाणले गेल्या महिन्यात थेरोंडा डोर्याची वाडी येथे 240 घरांना तर शनिवारी थेरोंडा आगळ्याची वाडी येथे 250 घरांना दिड ते दोन महिने पुरेल एवढं धान्य शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून वाटण्यात आले.
शेकाप युवक संघटना तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे यांनी शेकापक्षाने गेल्या दोन वर्षात केलेल्या कामाची माहिती उपस्थितांना दिली आणि ज्या-ज्या वेळेला जनतेला गरज असेल, त्यावेळेला शेकापक्ष जनतेच्या पाठीशी खंभिरपणे उभा असेल असा विश्वास दिला. या धान्य वाटपासाठी विक्रांत वार्डे, रेवदंडा ग्रामपंचायत सदस्य संदीप खोत, सुरेश खोत, शरद वरसोलकर, अक्षय डिकले, संतोष टीवळेकर, राहुल टीवळेकर, अमोल टीवलेकर शेकाप कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी सर्वांनी माननीय आमदार भाई जयंत पाटील आणि चित्रलेखा पाटील यांचे आभार मानले.