शेकापकडून उद्या मोफत चष्मे वाटप

। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जिल्हा महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकारातून मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. 22 एप्रिल रोजी करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शास्त्रीनगर अलिबाग, गुरुजी हॉटेलजवळ सकाळी 11 वाजता पार पडणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक व चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तरी, जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संजय कांबळे, प्रकाश राठोड यांनी केले आहे.

Exit mobile version