विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

| पनवेल | वार्ताहर |

भारत राष्ट्र समिती (बीआरएस पार्टी) पनवेलतर्फे भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के. चन्द्रशेखर राव यांच्या आरोग्य सवलतीच्या विचारानूरुप तक्षशीला बुद्धविहार, सुकापुर-पालिदेवद विभागात धम्म चक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून सर्व नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषध वाटप शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये मोफत रक्तदाब, शुगर, ईसीजी व गरजेनुसार रक्त तपासणी करण्यात आली. जनतेला आरोग्य विषयी मोफत समुपदेशन व औषध वाटप हि करण्यात आले.

या उपक्रमाचे विभागातील नागरिकांनी उत्साहाने स्वागत केले. शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. भारत राष्ट्र समिती पार्टीचे पनवेल विधानसभा उप समन्वयक व पनवेल महानगर समन्वयक प्राध्यापक प्रफुल भोसले व ॲडव्होकेट निलम भोसले आपल्या संपुर्ण परिवारा सोबत कार्यक्रमात सहभागी होते. मातोश्री हॉस्पीटल व सीमीरा डायग्नोस्टीक्सचे डॉ. गणेश वाघचौरे आणि त्यांचे सहकारी डॉक्टर आशा यांची संपुर्ण टीम व तक्षशीला बुद्धविहार कमिटी, सुकापुर- पलिदेवद येथील नागरिकांचे प्रा. भोसले यांनी आभार मानले. पनवेल महानगरातील सर्व 20 प्रभागात नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषध वाटप शिबिर शृंखलांचे आयोजन करणार आहोत, असे सांगितले.

Exit mobile version