पालीत मोफत आरोग्य तपासणी शिबीर

शंभर जणांनी घेतला लाभ
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पाली बल्लाळेश्‍वर देवस्थान व वाय एम.टी.मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.19) भक्तनिवास क्रमांक 1 मध्ये मोफत आरोग्य तपासणी व अल्पदरात शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले. या शिबिरात तब्बल शंभर जणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. बल्लाळेश्‍वर देवस्थानच्या माध्यमातून वर्षभर विविध लोकोपयोगी व समाजाभिमुख उपक्रम राबविले जातात. यावेळी मूळव्याध, भगंदर, फिशर, पोटाचे विकार, हर्निया, अपेंडीसायटीस, पायनोनिडल सायनस, हायड्रोसिस व शरीरावरील गाठी आदी आजारांची तपासणी करण्यात आली. यावेळी तज्ञ शल्यचिकित्सक डॉ. शरदकुमार साळुंखे, डॉ. अभिषेक जाधव, डॉ. राहुल आस्कर, डॉ. किरण कुलकर्णी यांच्यासह बल्लाळेश्‍वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.धंनजय धारप, उपाध्यक्ष विनय मराठे, विश्‍वस्त माधव साने, उपेंद्र कानडे, सचिन साठे, राहूल मराठे व नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version