शिवजयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी

। महान । प्रतिनिधी ।

महान येथे शिव समर्थ मित्र मंडळ यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व माणुसकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रामराज येथे गुरुवारी (दि.19) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात नागरिकांची बीपी, पल्स, ईसीजी, ब्लड शुगर, डायबिटीस, संधिवात, खरुज तसेच इतर विविध आजारांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर गरजू रुग्णांना मोफत औषधोपचार देण्यात आले. शिबिरास गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या प्रसंगी गावातील मान्यवर रोहन कांबळे, दीपक पाटील, विकी महाले, ऋतिक करंज, मिलिंद महाले उपस्थित होते. तसेच उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव, माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था सचिव डॉ. राजाराम हुलवान तसेच डॉ. नितीन गांधी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

शिवजयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होऊन सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम राबविण्यात आला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Exit mobile version