चौल येथे मोफत आरोग्य तपासणी

| रेवदंडा | वार्ताहर |

चौल मुखरी गणपती मंदिर सभागृहात सागमळा राजा मित्रमंडळ, पिरांचे देऊळ व मावळा प्रतिष्ठाण पेण व गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पेण यांच्या सहकार्याने शुक्रवार (दि.23) अलिबाग तालुका मनसे विदयार्थी सेना यांनी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीराचे नियोजन महेश मनोहर घरत यांनी केले होते. या शिबीरात स्त्री रोग तपासणी, सामान्य तपासणी, नेत्र तपासणी, तसेच विविध शस्त्रक्रिया आदीचे मार्गदर्शन तज्ञ डॉक्टराचे वतीने देण्यात आले. चौल व पंचक्रोशीतील असंख्य गरजूंनी या मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

या शिबीरास शैलेश खोत, महेश घरत, राजेश तरे, विवेक चौगले, यश घरत, जय नागवेकर, नितिन पाटील, सचिन घरत, निश्‍चय रानवडे, संदेश झळके, प्रशांत शेणवेकर, सिध्देश शेणवेकर, आदीची प्रमुख उपस्थिती होती. गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पेणचे राजेश टेलर, डॉ. रत्नदिप गवळी, डॉ.नयन बहमे, डॉ. नयना पटेल, डॉ. सिध्दी घरत, डॉ. शुभम म्हात्रे, डॉ. नैना पटेल, डॉ.रिया मिरगळ, सचिन पाटील, सोनल पाटील, तेजस थळे, प्रज्ञा थळे, दिक्षिता पारंगे, भक्ती लुझानिया, संध्या पाटील, प्रिंयका वर्तक, वर्षा लखन, समिक्षा, पोर्णिमा, विदया, महिमा, निकिता, साक्षी, समिम, साक्षी व महेंद्र पिंगळे आदीने परिश्रम घेतले.

Exit mobile version