| रेवदंडा | प्रतिनिधी |
डॉ. आयेशा असीफ किरकीरे यांच्या अल-सेहा क्लिनिक चौलच्या वर्षपूर्तीनिमित्त शनिवार, 11 फेबु्रवारी रोजी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रक्तातील शुगर तपासणी, रक्तदाब, ऑक्सिजन व पल्स रेट तसेच रुग्णांना मोफत वैद्यकीय सल्ला देण्यात आला. चौल परिसरातील अनेक नागरिकांनी याचा घेतला. चौलमधील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी मोफत आरोग्य शिबीर आयोजन केल्याबद्दल डॉक्टरांचे आभार मानले.
तज्ज्ञ डॉक्टरांनी गरीब नागरिकांसाठी वेळोवेळी आरोग्य मार्गदर्शन शिबीर आयोजित केल्यास त्याचा चांगला फायदा नागरिकांना होईल व त्यांना आपल्या प्रकृतीची काळजी घेता येईल, असे सांगितले. आजच्या धकाधकीच्या जीवनात नियमित व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप व नियंत्रण ठेवल्यास आजारांवर मात करता येईल, असे डॉ. आयेशा यांनी नागरिकांना सल्ला देताना सांगितले. गावातील लोकांचे आशीर्वाद हेच माझे डॉक्टर होण्याचे समाधान आहे, असे त्यांनी सांगितले.