लायन्स क्लब कोलाडची सामाजिक बांधिलकी
| गोवे-कोलाड | वार्ताहर |
लायन्स क्लब कोलाड रोहा यांची सामाजिक बांधिलकीतून यांच्या वतीने गुरुवार, 6 व शुक्रवार, 7 ऑक्टोबर रोजी रोहा तालुक्यातील राजिप प्राथमिक शाळा पुगाव येथे येथील विद्यार्थ्यांची कोलाड येथील डॉ. गांधी नर्सिंग होम डॉ. विनोद गांधी यांच्या विशेष सहकार्र्याने व दंतचिकित्सा तज्ज्ञ डॉ. तनुजा पवार यांनी राजिप शाळा पुगाव येथील इयत्ता पहिली ते चौथीच्या एकूण विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी व त्यांना उपचार करण्यात आले. त्यापाठोपाठ शुक्रवारी 7 ऑक्टोबर रोजी राजिप शाळा गोवे येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी जनलर सर्जन डॉ. विनोद गांधी यांनी येथील विद्यार्थी वर्गाची आरोग्य तपासणी करत त्यांना मोफत औषधोपचार दिले.
यावेळी खांब विभागातील शिक्षणप्रेमी नारायणराव धनवी, पुगाव शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा नीलम कलमकर, संजना शिंदे, येळकर, देशमुख मॅडम, अंगणवाडी सेविका व पालक तसेच केंद्रप्रमुख रत्नाकर कनोजे, मुख्याध्यापक निवास थळे, तसेच गोवे येथे गोवे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा सदस्य नितीन जाधव,माजी उपसरपंच संदीप जाधव,माजी सरपंच तथा सदस्य नरेंद्र पवार,सदस्या रंजिता जाधव, गावकमेटी अध्यक्ष नामदेव जाधव, युवक महेंद्र जाधव,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष पांडुरंग जाधव,सदस्य निलेश वाफिलकर,सदस्या सुचिता शिर्के, पायल जाधव, मुख्यध्यापक जयेश महाडिक सर, शिक्षिका गांधारे मॅडम, असंख्य पालक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.