शिवसेनेचे दक्षिण मुंबईत विनामूल्य महालसीकरण

मुंबई | प्रतिनिधी |
दक्षिण मुंबई मध्ये शिवसेनेने 23 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट असे 3 दिवस नागरिकांसाठी महालसीकरण मोहिम राबवली, त्याला मुंबईकरांचा भरघोस प्रमाणत प्रतिसाद मिळाला. या मोहिमेचा प्रारंभ खा. अनिल देसाई यांच्या हस्ते शारदा सदन शाळेत झाला. त्यावेळी शिवसेना दक्षिण मुंबई विभाखप्रमुख पांडुरंग सकपाळ, 218 चे शाखाप्रमुख निलेश ( बाळा) अहिरेकर, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण मंत्री, मा. नगरसेवक दिलीप नाईक, महिला शाखा संघटिका नयना देहेरकर, लता गांधी, समस्त पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते. दोन दिवसांत शिवसेना शाखाक्रमांक 218 येथे 1950 लोकांचे, दक्षिण मुंबईतील इतर शिवसेना शाखांमध्ये हजारो लोकांचे विनामूल्य महालसीकरण झाले.

Exit mobile version