| अलिबाग | वार्ताहर |
जिल्हा उद्योग केंद्राच्या मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती (सी.एम.ई.जी.पी.) योजनेंतर्गत कर्ज व अनुदान घेऊन उद्योग सुरु करु इच्छिणार्यांसाठी तीन मोफत प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले आहे. या अंतर्गत केवळ अनुसूचित जाती एससी प्रवर्गातील महिला व पुरुषांना तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या उद्योगसंचालकद्वारे पुरस्कृत जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (सीएमईजीपी) रायगडद्वारे घेण्यात येणार्या या प्रशिक्षण क्षेत्रासाठी दि. 24 मार्चपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे. पहिले 45 दिवसीय सोलर पिव्ही टेक्निशियन (आर.टी.ई.डी.पी) चाळीस जागा, आयटीआय किंवा 12 पासद्वारे 45 दिवसीय फूड व अॅग्रो प्रोसेसिंग 40 जागा, किमान आठवी पास तिसरे उद्योजकता विकास प्रशिक्षण जागा आठवी पास अशी पात्रता आहे. सर्व प्रशिक्षण रायगड येथे निवासी स्वरुपाचे असून, उमेदवार हा रायगड जिल्ह्याचा असावा, अशी अट आहे.
वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे या गटातील महिला व पुरुषांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. एका कुटुंबातून एक प्रशिक्षणार्थ व्यक्तीला भाग घेता येईल. मात्र, त्या कुटुंबातील दुसर्या व्यक्तीला दुसर्या प्रशिक्षणात भाग घेता येईल. उमेदवाराने यापूर्वी या योजनेत प्रशिक्षण घेतलेले नसावे. त्यासाठी जातीचा, वयाचा, शिक्षणाचा दाखला, आधार, पॅन कार्ड व पासपोर्ट फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहेत. इच्छुकांनी अलिबाग जिल्हा रायगड जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आनंद विद्यागर प्रकल्प अधिकारी 9403078772, दिक्षा एमसीईडी सहाय्यक 9763025014 यांच्याशी संपर्क साधावा.