विद्यार्थ्यांना मोफत वाहनाची व्यवस्था

| खोपोली | प्रतिनिधी |

दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा नुकतीच सुरू झाली असून, श्री शिव छत्रपती विद्यालय देवन्हावे या शाळेतील विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी खोपोली येथे परीक्षेसाठी वेळेवर पोहचता यावे. या उदात्त विचारातून अभि युवा ग्रुप देवन्हावेचे ॲड. जयेश तावडे व सर्वं सदस्यांनी परीक्षा सुरू असे पर्यंत करण्यात आली. तसेच परीक्षा केंद्रातून घरी सोडविण्यात येत आहे. हा उपक्रम गेली नऊ वर्ष सुरू असलेले सांगण्यात आले. याबाबत अभी युवा ग्रुप देवन्हावेचे ॲड. जयेश तावडे यांनी सांगितले की, श्री शिव छत्रपती विद्यालय देवन्हावे या शाळेत ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात. प्रत्येकाची परस्थिती घरची उत्तमच असते असे नाही.आम्हाला सुद्धा 10 वी ची परीक्षा देण्यासाठी खूप समस्या येत होत्या. त्यांची जाणीव मनामध्ये गेली 8 ते 9 वर्ष हा उपक्रम सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर शालेत जाता येते, किंवा घरी येवू शकतो. यावेळी मुख्याध्यापक कचरू चौधरी, यशवंत पाटील, अभि देवेश तावडे, ॲड. जयेश तावडे, जयेश पालांडे, ओंकार वाणी, विलास दाबके, पुंडलिक पाटील, राजा पाटील तसेच मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.

Exit mobile version