। पनवेल । वार्ताहर ।
वार्षिक एक लाखापर्यंतचे उत्पन्न असणार्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जात आहे. महात्मा फुले आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेशी जोडलेल्या सर्व रूग्णालयांत याअंतर्गत उपचार मिळतील. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात हेल्थकार्ड वाटप केले जात आहेत. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणुन ओळखल्या जाणार्या पनवेल तालुक्यात देखील या योजनेचे कार्ड वाटप केले जाणार आहेत. राज्यात डॉ सुधाकर शिंदे हे या या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. शिंदे यांच्या कार्यकाळात या योजनेची उत्तम अंमलबजावणी करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात पनवेल हा सर्वात मोठा तालुका आहे. जिल्ह्यात या योजनेचे 4 लाख 35 हजार लाभार्थी आहेत. यापैकी 70 हजारापेक्षा लाभार्थी पनवेलमध्ये असुन या लाभार्थ्यांचे कार्ड देखील तयार झाले आहेत. आयुष्यमान भारत व महात्मा फुले जण आरोग्य योजना या एकत्रित राबविल्या जात आहे. महात्मा फुले जण आरोग्य योजनेकरीत केशरी पांढरे पिवळे हे रेशनकार्ड धारक पात्र असणार आहेत तर आयुष्यमान भारत करिता 2011 च्या सामाजिक आर्थिक जनगणनेच्या आधारे पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.रायगड जिल्ह्यात 447 आपले सरकार केंद्र आहेत. या केंद्रांवर लाभार्थ्यांना आयुष्यमान भारतमध्ये नाव असेल तर कार्ड प्राप्त करून घेता येणार आहे. पनवेल परिसरातील एमजीएम रुग्णालय कामोठे, एमजीएम रुग्णालय कळंबोली, लाईफ लाईन हॉस्पिटल पनवेल, पटवर्धन रुग्णालय पनवेल, बिरमोळे रुग्णालय कामोठे, पनवेल हॉस्पिटल, श्री साई मल्टिफेशालिस्ट खारघर, श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल कळंबोली, आयएमटी खारघर, सत्य साई संजीवनी हॉस्पिटल खारघर, टाटा एक्ट्रेक्ट सेंटर खारघर, उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे होणार आहेत.
कोव्हिड रूग्णांना देखील लाभ
आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेची एकत्रित अंमलबजवानी केली जात आहे. कोव्हिड रुग्णांना देखील या योजनांचा लाभ झाला असल्याची माहिती या योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.वैभव गायकवाड यांनी दिली.