| अलिबाग | प्रतिनिधी |
चिंचोटी येथील माजी सरपंच, कलावंत, स्वातंत्र्य सैनिक गोविंद गणू पाटील (वय 103) यांचे वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने जुन्या पिढीतील हरहुन्नरी कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवारी (दि.11) दुपारी 3 वाजता, मारुती मंदिर येथे शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, शनिवारी आ.जयंत पाटील यांनी चिंचोटी येथे जाऊन गोविंद पाटील परिवाराचे सांत्वन केले. यावेळी अलिबाग तालुका चिटणीस अनिल पाटील, गिरीश तेलगे, सुधीर चेरकर, प्रकाश खडपे, सुधीर पाटील, जयवंत ठाकूर, जयवंत तांबडकर, सुभाष वागळे, नवनीत पाटील, संजय पाटील व वसंत पाटील उपस्थित होते.