| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन, दिघी सागरी आणि म्हसळा पोलीस ठआणे आणि गोखले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीवर्धन शहरातून नुकतेच दौड रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तिन्ही पोलीस ठाण्यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली यामध्ये श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक श्री.संजय पाटील, पोमण, सुर्वे, प्राचार्य डॉ.श्रीनिवास जोशी,सर्व पोलीस कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. स्वामी यांनी या रॅलीला झेंडा दाखविला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त श्री.स्वामी यांनी शुभेच्छा दिल्या व भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात भारताने केलेल्या प्रगतीची माहिती दिली.तहसिलदार श्री.सचिन गोसावी यांनीही शुभेच्छा दिल्या.न.प.चे मुख्याधिकारी विराज लबडे व नागरिकांनीही या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानिमित्त विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर करुन लोकांसमोर देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता,सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता, सामाजिक बांधिलकी हे गुण निर्माण होतील असा संदेश दिला.प्राचार्य डॉ.श्रीनिवास जोशी ,र प्रा.किशोर लहारे,प्रा.नवज्योत जावळेकर यांनी सक्रीय सहभाग घेतला.