शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘दोस्ती अभ्यासाची’

| अलिबाग | प्रतिनिधी |

‘झेप सोशल अ‍ॅक्शन रिसर्च ट्रस्ट’ ही संस्था मागील 27 वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून वरील विषयांची कार्यशाळा शालेय मुलांसाठी आयोजित करत आहे. ‘दोस्ती अभ्यासाशी’ ही तीन दिवसीय कार्यशाळा असून, दहा वेगवेगळ्या विषयांची माहिती, कृती कार्यक्रम या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना दिले जातात.

दरम्यान, संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम तयार केलेले आहेत. कोरोनाच्या काळात शाळा काही महिने बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या लेखन, वाचन, पाठांतर, अभ्यासाची बैठक, स्वयंअध्ययन व एकूणच अभ्यासाच्या विविध सवयींवर नकारात्मक परिणाम झालेला शिक्षकांच्या नजरेस दिसून येत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून वरील विषयांची कार्यशाळा शालेय मुलांसाठी आयोजित करत आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातील 110 शाळांमधील जवळपास 45 हजार विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तरी शालेय संस्थांनी आपल्या शाळांमधील नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थी व शाळेचा लाभ करून घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

अधिक माहिती व संपर्कासाठी 8369565564, 9422489602 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येत आहे.

Exit mobile version