विजय भोईर यांची संकल्पपूर्ती

। उरण । वार्ताहर ।
उरण, नवी मुंबई येथील गोरगरीब जनतेला मायेचा हात पुढे करणार्‍या विजय-विकास सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी 55 वेळा रक्तदान करण्याचा संकल्प पूर्ण केला आहे.

विजय भोईर हे उरण तालुक्यातील अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग घेत असतात. त्यांनी विविध ठिकाणच्या रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले आहे. तसेच रुग्णांना तातडीने रक्त पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. गणेशोत्सवाचे औचित्य साधून उरण शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन त्यांनी 55 वेळा रक्तदान करण्याचा संकल्प पूर्ण केला आहे.

Exit mobile version