18 वर्षांखालील मुलांना पूर्ण लसीकरणाचा दर्जा

। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्यशासनाद्वारे नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयान्वये 18 वर्षांखालील मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने या मुलांची सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी होणारी कोंडी दूर करण्याठी या मुलांना तसेच वैद्यकीय कारणात्व लस घेऊ न शकणार्‍या व्यक्तींना पूर्ण लसीकरण झाल्याचा दर्जा दिला जाणार आहे.
वैश्‍विक महामारीमुळे करण्यात आलेली टाळेबंदी टप्प्याटप्प्याने काढण्यात येत आहे. यासंदर्भात निर्बंध शिथिल करताना कोरोना प्रतिबंधक लसीकरणात ज्यांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत त्यांनाच सार्वत्रिक ठिकाणी प्रवास, विलगीकरणातून सूट, काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सद्यःकाळात पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीच्यया व्याख्येमध्ये करोना प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा घेऊन 14 दिवसांचा कालावधी होणार्‍यांचा समावेश होतो. मात्र लोकांची इच्छा असताना सुद्धा वैद्यकीय कारणामुळे किंवा त्यांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी असल्यामुळे ते लस घेऊ शकत नाहीत. अशा वंचित नागरिकांना पूर्ण लसीकरण झालेल्यांचा दर्जा आणि सेवा सवलती देण्यासाठी लसीकरण झालेल्या लोकांच्या व्याख्येत सुधारणा करण्यात आली आहे.
यानुसार ज्या व्यक्तीला वैद्यकीय कारणांमुळे लस घेणे शक्य नसेल आणि मान्यता प्राप्त डॉक्टराकडून त्यांनी अशा प्रकारचे प्रमाणपत्र मिळविले असेल तयेच 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीचा समावेश पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींमध्ये करण्यात आला आहे.

Exit mobile version