फन किड्स प्री स्कूलचा निरोप समारंभ उत्साहात

| नवीन पनवेल | वार्ताहर |
रघुकुल शिक्षण प्रसारक संस्था रायगड यांच्या नवीन पनवेल येथील फन किड्स प्री स्कूलचा दिनांक 17 मार्च रोजी निरोप समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक भारतभूषण पाटील, सहशिक्षिका गायत्री पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष भारतभूषण पाटील म्हणाले की, संस्थेच्या माध्यमातून वर्षभरात योगा डे, वृक्षारोपण, रक्षाबंधन, गोपाळकाळा, होळी, दिवाळी, आजी-आजोबा दिवस, सांस्कृतिक कार्यक्रम, इनडोअर क्रीडा आणि आऊटडोअर स्पोर्ट्स, पालकांचे स्पोर्ट्स, शैक्षणिक सहल याचबरोबर स्वतंत्रता दिन, गणतंत्र दिन या दिवशी मुलांची प्रभात फेरी आयोजित केली जाते असे सांगितले.

यावेळी बोलताना रत्नाकर पाटील, गायत्री पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निधी रसाळ, प्रणाली मुंडे, सुनंदा बाटे यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version