जेएनपीटी तर्फे लोकनेते दि.बा.पाटील इंजीनीअरींग कॉलेजसाठी निधी

। उरण । वार्ताहर ।
जेनपीटी विश्‍वस्त मंडळाची मीटिंग जेएनपिटी अ‍ॅडमिनीस्ट्रेटीव्ह बिल्डींग येथे संपन्न झाली. त्यामधे जेएनपीटीचा एकूण 6 कोटी रुपयांचा सिएसआर फंड वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापैकी 2 कोटी 5 लाख रुपये हे उरण तालुक्यासाठी देण्यात आले आहेत. तर उर्वरीत 3 कोटी 95 लाख उर्वरीत रायगड जिल्ह्यात वाटप होणार आहेत. त्यामुळे उरणकरांचा लोकनेते दि.बा. पाटील इंजीनियरिंग कॉलेजच स्वप्न साकार होणार आहे. जेएनपीटी विश्‍वस्त भूषण पाटील यांनी यासाठी विविध मार्गाने आनेक महिने प्रयत्न केले होते. त्यासाठी त्यांना दुसरे कामगार विश्‍वस्त दिनेश पाटील यांचीही मोलाची साथ लाभली. उरणमध्ये देण्यात आलेल्या सिएसआर फंडापैकी लोकनेते दि.बा. पाटील इंजीनियरिंग कॉलेजसाठी 1 कोटी 80 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ते दरवर्षी 60 लाख रूपयांप्रमाणे देण्यात येणार आहेत. तसेच द्रोणगीरी स्पोर्ट्स आसोशिएशनला 15 लाख रूपये, महिलांना सॅनेटरी नॅपकीनसाठी व सावरकर विद्यालय नविन शेवासाठी प्रसाधनगृह बांधण्यासाठी एकूण 10 लाख रूपये देण्यात येणार आहेत. यावेळी जेएनपीटी विश्‍वस्त भूषण पाटील यांनी हनुमान कोळीवाड्याच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न उपस्थित केला असता, जेएनपीटी चेअरमन संजय सेठी यांनी मिटींग घेऊन सदर सोडविणार असल्याचे संगितले.

Exit mobile version