शशिकांत पवार अनंतात विलीन

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार (82) यांचे मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मराठा समाजासाठी आयुष्य वाहणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. पवार मंडणगडवरून कारने मुंबईकडे निघाले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी 11 वाजता दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मराठा समाजासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Exit mobile version