| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने चौदा वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय 40 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या मंगळवारी (दि.19) झालेल्या अंतिम सामन्यात फ्युचर स्टार क्रिकेट क्लिनिक संघानी करण क्रिकेट अकॅडमी पनवेल संघाचा विजय मिळवत स्पर्धेची चॅम्पियनशिप पटकावली आहे. तर, करण क्रिकेट अकॅडमी पनवेल संघाला उपविजयी स्थानावर समाधान मानावे लागले.
प्रथम फलंदाजी करतांना करण क्रिकेट अकॅडमी संघाने निर्धारित 40 षटकांच्या समाप्ती नंतर 10 गडी गमावत 115 धावा फलकावर नोंदविल्या. त्यामध्ये पीयूष दांडेकर यांनी सर्वाधिक 31 धावा काढल्या. यावेळी फ्युचर स्टार क्रिकेट क्लिनिक संघाकडून कियांश यांनी 2, तर ओजस उपाध्ये, पुनीत मिश्रा, जीवांश शर्मा, आराध्य कळंबे यांनी प्रत्येकी एक फलंदाजाला बाद केले. 116 धावांचे लक्ष घेऊन फलंदाजीला आलेल्या फ्युचर स्टार क्रिकेट क्लिनिक संघाने अवघ्या 29 व्या षटकात 4 गडी गमावत 119 धावा काढून विजय प्राप्त केला. त्यामध्ये आराध्य कळंबे यांनी सर्वाधिक 39, आरव दीक्षित 34 व साद अहमद यांनी 18 धावांचे योगदान संघाला दिले. करण क्रिकेट अकॅडमीकडून आदर्श जैसवार यांनी 2, तर पीयूष दांडेकर व ओम गडगे यांनी प्रत्येकी 1 फलंदाज बाद केला. या स्पर्धेतील उत्कृष्ठ फलंदाज म्हणून आयुष भारती, उत्कृष्ठ गोलंदाज आदर्श जैसवार, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक अथर्व जाधव तर मालिकावीर म्हणून रोनीत चौहान यांना आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सदस्य प्रदीप खलाटे, अरुण शिंदे, प्रशिक्षक करण कांबळे, आदिल खान, पंच एजाज मारूफ, रमेश ढकोळ, अमर गुप्ता यांच्या हस्ते चषक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
फ्युचर स्टार क्रिकेट ठरला चॅम्पियन
