गावदेवी बाहे संघाची बाजी

| गोवे-कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील अजिंक्य क्रिकेट क्लब साई नगर खांब आयोजित मर्यादित क्रिकेट स्पर्धेत बाहे विरुद्ध गावदेवी नडवली यांच्यात झालेल्या अंतिम अटीतटीच्या सामन्यात अखेर गावदेवी बाहे संघाने बाजी मारत विजेतेपद पटकाविले. तर, नडवली संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तसेच स्पर्धेतील तृतीय क्रमांक मुठवली हा संघ मानकरी ठरला. उत्कृष्ट सामनावीर गावदेवी बाहे संघाचा राहुल थिटे, स्पर्धेतील उकृष्ट गोलंदाज नडवली संघाचा अक्षय शिर्के, तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून मुठवली संघाचा सूरज कापसे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

तत्पूर्वी, या स्पर्धेचे उद्घाटन पीएसआय एकनाथ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निलेश निळेकर, चंद्रकांत वरखले, डॉ. श्यामभाऊ लोखंडे, अविनाश म्हात्रे, योगेश खामकर, माजी उपसरपंच रविकांत पार्टे, रुपेश थिटे, सुनील तुपकर, अभिजित वरखले आदी मान्यवरांसह क्रिकेटपटू व प्रेक्षकमोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अजिंक्य क्रिकेट क्लब साई नगर खांब, खांब क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version