गावदेवी मुंढाणी संघाची बाजी

| खांब-रोहा | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील गावदेवी क्रीडा मंडळ बाहे यांच्या वतीने संपन्न करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय 60 किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अटीतटीच्या लढतीत पेण तालुक्यातील गावदेवी मुंढाणी संघाने सर्वोत्तम खेळ करीत चषकावर आपले नाव कोरले.

युवा नेते तथा गोवे ग्रा.पं. सरपंच महेंद्र पोटफोडे, माजी सरपंच नरेंद्र जाधव, उपसरपंच सूरज कचरे, मनोज बामणे, उद्योजक शंकर महाबळे, राकेश देवकर, मनेष थिटे, लिंबाजी थिटे यांच्या विशेष सहकार्याने संपन्न करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन येथील सरपंच वसंत भोईर, ओबीसी समन्वय समिती अध्यक्ष अनंत थिटे,ऐनघर कुणबी समाज अध्यक्ष यशवंत हळदे पत्रकार श्याम लोखंडे, ग्रा.पं. सदस्य विलास थिटे, दयाराम भोईर, रवींद्र राऊत व येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक थिटे, जगदीश थिटे, ज्ञानेश्‍वर थिटे, जनार्दन जाधव आदींच्या हस्ते करण्यात आले.

क्रीडाप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेतील उपविजेतेपद उडदवणे संघाने पटाकावले तर नवतरुण तळाघर, जय हनुमान मोरांडे अलिबाग यांना अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत सामनावीर म्हणून जयेश पाटील मुंढाणी, उत्कृष्ट चढाई मयूर कराळे उडदवणे, उत्कृष्ट पक्कड मोहन चव्हाण तळाघर, पब्लिक हिरो म्हणून सागर घासे यांना उपस्थित मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे समालोचन मनोज थिटे यांनी केले. तर, स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गावदेवी क्रीडा मंडळ बाहे व ग्रामस्थ मंडळ बाहे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Exit mobile version