। मुंबई । प्रतिनिधी ।
ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले खा.गजानन कीर्तिकर यांना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही मागणी मान्य केल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रात भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदं मिळावी, अशी मागणी शिंदे गटाने केली होती.
यासोबत दोन राज्यपाल पदांचीही मागणी मबाळासाहेबांची शिवसेना पक्षाने केली होती. अमित शाह यांनी यापैकी मंत्रिपदांची मागणी मान्य केल्याची माहिती आहे. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिपद मिळण्याच्या हेतूनेच गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचंही बोललं जात आहे.