। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव परिसर संकटहर्ते श्री गजानन महाराजांचा 12 वा प्रकट दिन सोहळा साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. श्री गजानन महाराज भक्त न्यास, माणगाव यांच्या पवित्र संकल्पनेतून हा दिव्य सोहळा रविवार, दि. 8 फेब्रुवारी रोजी भक्तांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. पहाटेपासूनच मंदिर परिसर अध्यात्मिक तेजाने उजळून निघणार आहे. सकाळी 7 ते 8 या वेळेत ‘श्री’ची महापूजा व पंचामृत अभिषेकाने प्रकट दिनाची मंगल सुरुवात होणार आहे. 9.30 ते 11 या वेळेत सार्वजनिक अभिषेकाचा भक्तिसोहळा पार पडेल. त्यानंतर 11 ते 11.45 या वेळेत स्तोत्र वाचन, भजन व नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिरसात डुबून जाणार आहे. दुपारी 12 ते 12.30 या वेळेत दिव्य महाआरती होणार असून, त्यानंतर 12.30 ते 3.00 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7 ते 7.45 या वेळेत महाआरतीने प्रकट दिन सोहळ्याची सांगता होणार आहे. हा पावन सोहळा मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाशेजारी, कचेरी रोड, माणगाव येथे साजरा होणार आहे.
गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606