दादर गावात जुगाराचा अड्डा सुरू

। पेण । वार्ताहर ।
दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दादर गावात राजरोजपणे जुगाराचा अड्डा सुरू आहे. गेल्या तीन महिन्यापूर्वी प्रसार माध्यमाने दादर गावातील जुगाराच्या अड्डयासंदर्भात बातम्या लावल्याने काही काळ हा जुगाराचा अड्डा बंद होता. परंतु गणपतीच्या काळात तर रात्रंदिवस हा अड्डा सुरू झाला आहे. आज कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेकांचे रोजगार गेले आहेत. परंतु जुगार खेळण्याच्या आंबटशोकींनांमुळे काही महाभाग आपल्या घरातील वस्तू दागदागिने विकत आहेत. त्यामुळे कौंटुंबीक हिंसाचाराचे देखील प्रमाण वाढलेले आहे. जुगार अड्डे चालवणारी मंडळी राजरोजपणे जुगार अड्डा चालवत आहेत. कोण तक्रार करण्यास गेल्यास उलट त्यांनाच दम देउन आमच तुम्ही काहीच वाकड करू शकत नाहीत. आम्ही हप्ते बांधलेले आहेत, अशा प्रकारचा दम दिला जातो. दादर गावामध्ये उरण, पनवेल या ठिकाणाहून देखील काहीजण जुगार खेळण्यासाठी येत आहेत. त्यामुळे कळत न कळत बाहेरून येणार्‍या आंबटशोकीनांमुळे कोरोनाचा प्रसार देखील या गावात होऊ शकतो. असे असताना पोलीस यंत्रणा गांधारीची भुमिका का बजावत आहेत हे दादर गावातील ग्रामस्थांना पडलेल कोड आहे.

Exit mobile version