महाडमधील गांधारी पुल वाहतुकीसाठी बंद

। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील गांधारी पूल हा ब्रिटिश काळातील असून शेवटची घटका मोजत आहे. या पुलावरील संरक्षण कठड्यांची दुरवस्था झाली आहे. पुलाला खालून तडे गेले असून हा पूल कधीही कोसळण्याच्या परिस्थितीत निर्माण झाली आहे.

या पुलावरुन प्रवास करताना वाहन चालक व पादचार्‍यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे नगरपरिषदेने तात्काळ या पुलाची पाहणी केली. तसेच पूल धोकादायक असल्याने अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. सध्या दोन्ही बाजूला अवजड वाहने जाऊ नये, यासाठी बॅरिगेट लावण्यात आले असून सूचना फलकही लावण्यात आले आहेत.

Exit mobile version