पालीत घुमला मोरयाचा गजर

पाली/बेणसे | प्रकिनिधी |
राज्य सरकारने नवरात्री उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवार (दि.7) पासून सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्थरातून स्वागत होत आहे. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही त्यामुळे भाविकांनी दर्शन घेत असतांना सर्व नियम व निकषांचे पालन करावे असे आवाहन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केले. तटकरे यांनी बल्लाळेश्‍वराचे दर्शन घेतले.
सभामंडपातूनच भाविकांना दर्शनासाठी व्यवस्था केली आहे . मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांनी शासन नियमांचे पालन करून ट्रस्टला सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय धारप यांनी केले आहे.
दरम्यान राज्य सरकारने मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने मंदिरा बाहेर व्यवसाय करणार्‍या छोट्या मोठ्या व्यवसायिकांच्या चेहर्‍यावर आनंदी व समाधानाची झलक पहावयास मिळत आहेत,
यावेळी जि.प. सदस्य सुरेश खैरे, राष्ट्रवादीच्या गीता पालरेचा, तालुका अध्यक्ष रमेश साळुंखे, संदेश शेवाळे, अभिजित चांदोरकर, उपाध्यक्ष विनय मराठे व सर्व विश्‍वस्त यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version