गणेशभक्तांचा परतीचा प्रवास होणार सुखकर

महाड आगारातून सुटणार 50 बस गाड्या
| महाड | प्रतिनिधी |
गणेशभक्तांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा, म्हणून कोकणातील राज्य परिवहन महामंडळाचे सर्व आगार सज्ज झाले आहेत. महाड आगारातून 26 सप्टेंबर रोजी 60 जादा बसेसचे ग्रुप बुकींग झाले आहे. 27 आणि 28 सप्टेंबर रोजीचे ग्रुप बुकींग सुरु आहे. मुंबई पुणे येथे जाणाऱ्या नियमित फेऱ्या, जादा फेऱ्यांमुळे बाहेरच्या आगारातून 50 बसेसची मागणी करण्यात आली आहे पैकी आत्तापर्यंत 30 बसेस आगारात दाखल झाल्या आहेत अशी माहिती वाहतुक नियंत्रक शिवाजी जाधव यांनी दिली.

महाड एस टी स्थानकातून दररोज मुंबई पुणे येथे जाण्यासाठी नियमित 25 फेऱ्या असतात. या सर्व गाड्यांचे आगाऊ बुकींग फुल्ल झाले आहे. याखेरीज 26 सप्टेंबरला 60 बसचे ग्रुप बुकींग झाले असून 27 व 28 सप्टेंबर रोजी दरदिवशी 25 ते 40 गाड्यांचे बुकींग होऊ शकेल. याखेरीज 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान दररोज महाड-पनवेल अशा 15 फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.

महाड पोलादपूर तालुक्यात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी होईल यासाठी आमचा प्रयत्न असेल असे जाधव यांनी सांगितले. गणेशभक्तांनीही आम्हाला सहकार्य करावे असे वाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, चाकरमान्याच्या परतीच्या प्रवासाठी मोठ्या प्रमाणात एसटी महामंडाने सोय केली आहे. त्यामुळे परतीचा प्रवास आरामदायी होणार असल्याचे दिसून येते.

Exit mobile version