| कोलाड | वार्ताहर |
गणपती बाप्पांच्या आगमनाला अवघे पंधरा दिवस शिल्लक राहिले असताना कोलाडमधील गणेश मूर्तिकार प्रदीप एकबोटे त्यांच्या कारखान्यातील गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरवून बाप्पांचे स्वरूप सुंदर साजिरे करण्यासाठी गुंतले आहेत. तसेच कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे मूर्तीच्या किंमतीत ही वाढ होण्याची शक्यता आहे.
शाडूच्या मूर्ती हाताळण्यासाठी नाजूक असतात. परंतु प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती या मजबूत असतात त्यामुळे त्यांना ज्यास्त मागणी असते. लालबागचा राजा, जय मल्हार, बाहुबली, दगडूशेठ गणपती, पौराणिक कथा अशा मूर्तींना जास्त मागणी असते. यासाठी गणेश चतुर्थीच्या एक महिना अगोदर म्हणजेच श्रावण महिना निघाला का मूर्तींच्या बुकिंगला खऱ्या अर्थाने सुरवात होते. यामुळे मनासारखी मूर्ती मिळते, अन्यथा उपलब्ध असेल ती मूर्ती घ्यावी लागते. आलिकडच्या काळात मूर्तीचे रंग काम पूर्ण झालेतरी, मूर्ती अधिक सुंदर दिसावी यासाठी हिऱ्या-मोत्याचे दागिने,कलर असेल त्या रंगाची पेचक व डायमंड लावण्यात येत असुन यामुळे मूर्तीच्या किमती ही अधिक वाढल्या आहेत.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात माझ्या घराची जागा गेली. यामुळे गणेश मूर्तीसाठी जागा अपुरी पडत आहे. शिवाय आर्थिक चणचण, मजुरांची कमतरता जाणवत असूनही जवळ जवळ 100 वर्षांपासून सुरु असणारा कारखान्यात रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात 500 च्यावर मूर्तीची ऑडर असते.सुरूवातीच्या काळात सर्व मूर्ती येथे तयार केल्या जात होत्या. परंतु आता वयोरुद्ध झाल्यामुळे येथे काही वर्षांपासून हमरापूर येथून कच्च्या मूर्ती आणून त्यांचे रंग काम केला जात आहे.
प्रदीप एकबोटे, मूर्तिकार कोलाड







