गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: null;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 40;

बाजारपेठ सजली, चित्रशाळेत मूर्ती कारागीर दंग

| उरण | वार्ताहर |

गणेशोत्सवाला एक ते दोन दिवसांचा अवधी उरला असतानाच उरण तालुक्यातील अनेक कलाकारांच्या गणपती कारखान्यात हर तर्‍हेच्या गणेशमूर्तींवर रंगकामांचा शेवटचा हात फिरवण्यात मूर्ती कारागीर दंग झाल्याचे दिसून येत आहे. विविध प्रकारच्या प्लास्टिकच्या फुल, हार, झाडा, वेलीबरोबर रंगीबेरंगी विद्युत साहित्याची तसेच अगरबत्तीसह पूजेसाठी लागणार्‍या सामान, साहित्यांनी बाजारपेठ सजल्या आहे. तसेच ढोलकी विक्रेत्यांची गावागावात रेलचेल सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

उरण तालुक्यात दोनशे लहान-मोठे कारखाने आहेत. त्यातील एकट्या चिरनेर गावात 35 कारखाने आहेत. दरवर्षी मे ते जून महिन्यात सर्व कारखान्यात गणेशमूर्ती घडविण्याच्या कामाला सुरुवात होत असते. यावर्षीही वाढत्या वीज समस्येचा सामना हा मूर्ती कारागिरांना सहन करावा लागला आहे. दरम्यान, वाढत्या शाडू मातीच्या व रंगांच्या किमतीमुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत मूर्तीच्या किमतीत वाढ होणार असल्याचे मत चिरनेर चित्र शाळेतील मूर्तीकार जागृती राम चौलकर यांनी सांगितले.

Exit mobile version