सांगोला पोलीसांकडून चोरांची टोळी जेरबंद

सुमारे २५ लाख ९६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
सांगोला, आटपाडी आणि तासगाव तालुक्यातील चोरीच्या घटनांचा लावला छडा

। सांगोला । वार्ताहर ।

सांगोला, आटपाडी आणि तासगाव तालुक्यातील विविध चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावून सांगोला पोलीसांनी दमदार कामगिरी करत ७ जणांच्या चोरट्याच्या टोळीला जेरबंद करून मोटार सायकली, अशोक लेलंट टेम्पो, केबल वायर, इलेक्ट्रीक मोटार, स्टील, वेल्डींग मशीन, ग्रॅन्डर, कटर, पाणबुडी मोटार असा एकूण सुमारे २५ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

गणेश भिमराव शिंदे रा.मस्के कॉलनी, सांगोला, सचिन बाळासाहेब दिघे, स्वप्निल बापू ऐवळे दोघे रा. वासुद ता. सांगोला, बिरुदेव ऊर्फ बिऱ्या दादासो ऐवळे रा. फॅबटेक कॉलेजच्या पाठीमागे पंढरपूर रोड सांगोला, खंडु नामदेव चव्हाण रा. मणेरी गल्ली सांगोला, महेश सुरेश वाघमारे रा. भोकरेवस्ती सांगोला, अतुल श्रीकांत चंदनशिवे रा. वासुद ता.सांगोला, असे सांगोला पोलीसांनी जेरबंद केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगोला पोलीस ठाणे हद्दीत सांगोला शहर व ग्रामीण भागात मोटार सायकल चोरी, अशोक लेलंट टेम्पो, केबल वायर, इलेक्ट्रीक मोटार, स्टील चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी व उघड करण्यासाठी पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी सांगोला पोलीसांना निर्देश दिले होते.

सांगोला पोलीस ठाणे गुरनं १०३३ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९, ३४ प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील मोटार सायकल सांगोला शहारातील चोरटयांनी चोरी केली आहे. त्याअनुशांगने सांगोला पोलीसांनी तपास केला असता आरोपी यांनी सदरची मोटार सायकल व इतर चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुशांगने चौकशी केली असता त्यांनी सुमारे २५ लाख ९६ हजार रुपये किंमतीचे ३ अशोक लेलंट कंपनीची लहान टेम्पो, ५ मोटार सायकली, सुमारे साडे तीन टन स्टील, वेल्डींग मशीन, ग्रॅन्डर, कटर, पाणबुडी मोटार इ . साहित्य काढून दिले आहे .

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रा. तेजस्वी सातपुते) अपर पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण हिंमतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा राजश्री पाटील, पो.नि. अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, स.पो.फौ. कल्याण ढवणे, पो.हे.कॉ. अस्लम काझी, सचिन वाघ, पो.ना. अनिल निंबाळकर, पो.कॉ. अमर पाटील, पैगंबर मुलाणी, होमगार्ड गणेश झाडबुके सांगोला पथक तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पो.कॉ. अनवर अत्तार यांनी केली आहे.

उघड झालेले गुन्हे
अ) सांगोला पोलीस ठाणे कडील उघड गुन्हे
१ ) गुरनं १०२० /२०२२ भादवि कलम ३७९, ३४ प्रमाणे
२ ) गुरनं १०३३ / २०२२ भादवि कलम ३७९, ३४ प्रमाणे
३ ) गुरनं ४४८/२०२२ भादवि कलम ३७९, ३४ प्रमाणे
४ ) गुरनं १०४३/२०२२ भादवि कलम ३७९, ३४ प्रमाणे

ब ) आटपाडी पोलीस ठाणे कडील उघड गुन्हे खालील प्रमाणे १ ) गुरनं २४८ / २०२२ भादवि कलम ३७९
२ ) गुरनं ३०१ / २०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे
३ ) गुरनं २६५ / २०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे
४ ) गुरनं २४१ / २०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे

क) तासगाव पोलीस ठाणे कडील उघड गुन्हे खालील प्रमाणे
१) गुरनं ४०७ / २०२२ भादवि कलम ३७९
२ ) गुरनं ४२४ / २०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे

Exit mobile version