| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने तळोजा येथील पेंधर गावातील घरावर छापा मारुन महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला 5.40 लाख रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखू साठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गुटख्याचा साठा करुन ठेवणाऱ्यांना अटक केली आहे. सतिशसिंग नेपाळसिंग ठाकूर (32) आणि जितेंद्र राजवुमार कामत (21) या दोघांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. आरोपींनी हा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ कुठून आणला? याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.