गॅस सिलिंडर झाला स्वस्त

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

दिवाळीनंतर एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याच्या बातम्या येत असतानाच आता दिलासा देणारी बातमी आली आहे. तेल कंपन्यांनी आज दि.16 रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती कमी केल्या आहेत.

19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत थोडासा दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी किंमत 57.50 रुपयांनी कमी केली आहे. नवे दर आजपासून लागू झाले आहेत. दिवाळीच्या आधी म्हणजेच 1 तारखेला व्यावसायिक सिलिंडरचे दर 101.50 रुपयांनी वाढले होते. नवीन बदलानंतर, 19 किलोच्या सिलेंडरची किंमत दिल्लीत 1755.50 रुपये, कोलकात्यात 1885.50 रुपये, मुंबईत 1728 रुपये आणि चेन्नईमध्ये 1942 रुपये प्रति सिलेंडर आहे. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपये प्रति सिलेंडर आहे.

Exit mobile version