कर्जतमधील विवाह सोहळे ‌‘गॅस’वर

आगरी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

| नेरळ | प्रतिनिधी |

आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्यामुळे एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे. परंतु, घरगुती गॅस सिलिंडर वाटपाबाबत शासनाने कालमर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे अडचणीच्या वेळी गॅस सिलिंडर अभावी मोठी धावपळ होत आहे. ही अडचण लक्षात घेऊन शासनाने विवाह सोहळे असलेल्या ग्राहकाला अत्यावश्यक बाब म्हणून घरगुती वापराचे दोन सिलिंडर देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करणारे निवेदन रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे. कर्जत तालुका आगरी समाज संघटनेकडून हे निवेदन देण्यात आले असून शासनाने या मागणीच विचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सध्याच्या लग्नसराईच्या काळात लग्नकार्य ज्यांच्याकडे आहे, अशा मालकांची शासनाच्या या निर्णयामुळे मोठी अडचण झाली आहे. सध्या घरगुती गॅस सिलिंडर सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात स्थानिक आचारी यांच्या मदतीने जेवण बनविले जाते. त्यासाठी दोन दिवसांच्या शुभकार्यासाठी गॅस सिलिंडर यांच्या किमान दोन टाक्या आवश्यक असतात.परंतु, एकावेळी गॅस सिलिंडरचे दोन टाक्या सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. त्याचा परिणाम ग्रामीण भागात लग्नकार्य कशी करायची? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर वितरण करण्याचे सर्वाधिकार असलेले रायगड जिल्हाधिकारी यांनी शुभ कार्ये असलेल्या कुटुंब प्रमुखांना दोन घरगुती गॅस सिलिंडर देण्याचा विचार करावा, अशी मागणी कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे यांनी रायगड जिल्हाधिकारी यांची भेट निवेदनाद्वारे केली आहे.

Exit mobile version