कर्जत नगरपरिषद हद्दीमध्ये गॅस्ट्रोचे रुग

। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत नगरपरिषद हद्दीमध्ये गॅस्ट्रोचे रुग आढळून आले आहेत, त्यामुळे नगरपरिषदेचे एकच धावपळ उठाली आहे, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी घटनास्थळी पाहणी केली व तातडीने पाण्याचे नमुने तपासणी साठी पाठवले पाण्याच्या नमुन्याचा अहवाल नॉर्मल आला आहे, मात्र हे रुग्णांना गॅस्ट्रोची लागण कशी झाली याचा शोध आरोग्य विभाग घेत आहे.

13 एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय मधून कर्जत नगरपरिषदेस एक पत्र आले, ज्यामध्ये आठ ते दहा गॅस्ट्रोचे रुग्ण असल्याचे निदर्शनास आले आहे, त्यामुळे नगराध्यक्ष यांनी आरोग्य विभाग कर्मचारी यांची तातडीने बैठक घेऊन ज्या परिसरात रुग्ण सापडले आहेत, त्या परिसराचे पाईपलाईनला कुठे लिकेज आहे का? याची तपासणी करून घेण्यास सांगितले. तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले, जलशुद्धीकरण केंद्रावर भेट दिली असता तिथं सर्व यंत्रणा व्यवस्थित चालू असल्याचे निदर्शनास आले. क्लोरीनची मात्रा पण व्यवस्थित दिले जात आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणे जरुरी आहे त्यासाठी पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन सोशल मीडियावर केले. याबाबत रिक्षा फिरवून लोकांना आवाहन करण्यात येत आहे, तसेच तिव्र उन्हापासून काळजी घ्यावी असे सांगण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली तसेच रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.मनोज बनसोडे यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी त्यांच्या समवेत नगरपरिषदेचे सुदाम म्हसे, पाणीपुरवठा विभागाचे हरिश्‍चंद्र वाघमारे, विलास गायकवाड, मालू निरगुडा उपस्थित होते.

नगरपरिषदेने तातडीने सर्व पावले उचलली असून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. रुग्ण आढळल्यास त्वरित उपजिल्हा रुग्णालय किंवा नगरपरिषदमध्ये कळवावे.

-सुवर्णा जोशी, नगराध्यक्षा, कर्जत नगरपरिषद
Exit mobile version