बचत गटाच्या माहिलांचा मेळावा

| कर्जत | वार्ताहर |

जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ फाऊंडेशनवतीने रविवारी (दि.10) अ‍ॅड. पूजा सुर्वे यानीं पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व बचत गटाच्या माहिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सुमारे 76 महिलानीं सहभाग घेतला होता. बचत गटातील महिलासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रताप सुर्वे, श्रीरंग दरेकर, काशिनाथ पवार, सदा आहेर, प्रतिक सुर्वे, सूदाम अव्हाड, राहुल निगुड़कर, उदय दरेकर यांनी सहकार्य केले. लीना कोशे यांनी मेळाव्याचे सूत्र संचलन केले होते.

Exit mobile version