। उरण । प्रतिनिधी ।
रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय फुंडे उरणमधील गौरव ठाकूरची मुंबई विद्यापीठा अंतर्गत ऑल इंडिया आंतर विद्यापीठ 27 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान स्वामी विवेकानंद सुभारती विद्यापीठ मीरूर, उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत इंटरझोन एअर पिस्टल स्पर्धा दि.12, 13 नोव्हेंबर रोजी सी.एच.एम कॉलेज, उल्हासनगर अंबरनाथ राइफल अँड पिस्टल शूटिंग रेंज अंबरनाथ येथे पार पडली होती. या स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्टलमध्ये मुंबई सिटी झोन आणि महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक मिळवून दिला. या यशाबद्दल गौरवचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पी. जे. पाटील, कॉलेज विकास समितीचे अध्यक्ष बाळाराम पाटील, सुधीर घरत, भावना घाणेकर प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक आणि जिमखाना प्रमुख देवेंद्र कांबळे व सर्व जिमखाना सदस्यांनी अभिनंदन केले आहे.







