कुसुंबळे | वार्ताहर |
गेले पाच दिवस विराजमान झालेल्या कुसुंबळे येथील गौरी – गणपतींचे मोठ्या उत्साहपूर्ण व भावपूर्ण वातावरणात कोरोनाच्या नियमांचे पालन करून विसर्जन करण्यात आले. यावेळी सुरक्षित अंतर ठेवून तसेच स्वच्छतेची काळजी घेत शांततापूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. तलावात कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक व फुले न टाकण्याची जबाबदारी गावातील प्रत्येक नागरिकाने घेतली हे विशेष कौतुकास्पद ठरले. पावसाचा अंदाज घेवून घरातील प्रत्येकाने आपापल्या परीने सार्वजनिक तलावात गणपती विसर्जन केले. यावेळी भक्तीगीते गात भक्तिमयी वातावरणात परिसरातील लोकांनी गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देत ” गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या” अशा घोषणा देत जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप दिला. मात्र गेले दोन वर्षे कोरोनामुळे गावातील गणपती एकत्रितरित्या विसर्जनासाठी नेता येत नाही याची खंत अनेकांनी यावेळी व्यक्त केली व लवकरच कोरोना हद्दपार होवू देत व पुन्हा एकदा परंपरेनुसार सणवार एकत्रितरित्या साजरे करण्याचे भाग्य सर्वांना मिळोत हा आशावाद यावेळी व्यक्त करीत बाप्पाला अखेरचा निरोप दिला.Attachments area