। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील अती दुर्गम भागातील रजपे गावातील सावित्रीच्या लेकीने चार्टर्ड अकाऊंटंटच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपल्या माता पित्याचे तसेच पिंगळे कुटुंबाचे नाव उंचावले आहे. कर्जत तालुक्यातील रजपे गावातील सर्वसामान्य कुटुंबातील गायत्री (गौरी) मनोहर पिंगळे हिने प्रतिकुल परिस्थितीत आपल्या इच्छा शक्तीच्या जोरावर सातत्यपूर्ण अभ्यास करून यंदाच्या चार्टर्ड अकाउंटटची परीक्षा दिली होती. त्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्या परीक्षेत गायत्रीने चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन उज्वल यश संपादन केले आहे. तीचे व तिच्या कुटुंबांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.