महाविद्यालयात लिंग भेदभाव जाणीव जागृती

| अलिबाग । वार्ताहर ।
जेएसएम महाविद्यालय अलिबाग येथील महिला विकास कक्ष आणि अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात दि.20 जुलै रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी लिंग भेदभाव जाणीव आणि जागृती या विषयावर कार्यक्रम कै.जयवंत केळुसकर सभागृहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अलिबागमधील प्रसिद्ध वकील अ‍ॅड. नीला तुळपुळे उपस्थित होत्या.

जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. साक्षी गौतम पाटील यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. वर्षा पाटील ह्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपस्थितांना करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. साक्षी पाटील यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करत आजच्या काळात स्री-पुरुष समानता का गरजेची आहे, हे पटवून दिले. प्रमुख मार्गदर्शक अ‍ॅड. तुळपुळे यांनी विद्यार्थ्यांना लिंग भेदभाव जाणीव म्हणजे काय आणि त्याची समाजात जाणीव कशी असली पाहिजे याचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी सुद्धा संवाद साधला. ह्या कार्यक्रमासाठी महिला विकास कक्ष व अंतर्गत समितीमधील प्रा. गौरी लोणकर, प्रा.जयश्री पाटील, डॉ.सोनाली पाटील प्रा. समृद्धी पाटील, प्रा. प्राची रानडे, श्रद्धा थळकर, संचिता टिळेकर उपस्थित होत्या. प्रा. शिल्पा कवळे यांनी महाविद्यालयाच्या वतीने उपस्थितांचे आभार मानले.

Exit mobile version