उद्या कर्जतमध्ये महासभा

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात टोरंट पॉवर कंपनीचा तीन हजार मेगावॉट क्षमतेचा साई डोंगर-1 जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्प होत असून, त्यासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधातील आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळू लागला आहे. शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विविध पर्यावरणवादी संघटना या मुद्द्यावर एकत्र येत असून, चित्रलेखा पाटील, आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांनीही समाजमाध्यमांवरून वृक्षतोडीच्या मुद्द्यावर सरकारला जाब विचारला आहे. बुधवारी (दि.28) टोरंट पॉवर कंपनीच्या वृक्षतोडीविरोधात कर्जतमध्ये सभा आणि स्थळ पाहणी होणार आहे. या सभेला कर्जत आणि खालापूर तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version