अभ्युदय बँकेची सर्वसाधारण सभा

। मुंबई । प्रतिनिधी ।
अभ्युदय को-ऑप. बँकेने कोविड -19 च्या नियमांचे पालन करुन आपली 58वी वार्षिक सर्वसाधारण सभा 30 सप्टेंबर, 2021 रोजी अभ्युदय बँक हॉल, सेक्टर 17, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित केली. सभेत बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रेमनाथ सालियन यांनी बँकेची आर्थिक स्थिती भागधारकांसमोर मांडली. बँकेच्या भागधारकांनी बँकेबद्दल त्यांची मते मांडली आणि बँकेमुळे त्यांची आर्थिक प्रगती कशी झाली हे सांगितले. सभेत बँकेचे मानद अध्यक्ष श्री सिताराम घनदाट यांनी भागधारकांना आश्‍वासन दिले की बँकेची वाढ आणि नफा सुनिश्‍चित करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना बँक करीत आहे. बँकेचे अध्यक्ष श्री. संदिप घनदाट यांनी कोविडच्या आव्हानात्मक काळात बँकेवरील विश्‍वास व्यक्त केल्याबद्दल सर्व भागधारकांचे आभार मानले आणि बँक बाजारपेठेच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवेल आणि किरकोळ व्यवसायाला चालना देण्यासाठी कर्जावरील व्याजदर आणखी कमी करेल असे आश्‍वासन दिले.

Exit mobile version