सरकारच्या योजनांचा महामेळावा

| नेरळ । वार्ताहर ।
राज्य व केंद्रशासनाच्या विविध योजनाचा महामेळावा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात कर्जत आणि खालापूर तालुक्याचा महामेळावा कर्जत येथील रॉयल गार्डन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कर्जत आणि खालापूर तालुक्यातील विविध विभागातील विविध सेवा व योजनाची माहिती तळा गळातील जन सामान्य शेतकरी व नागरिकांन पर्यंत स्टॉल लावून पोहचविण्यात येणार आहे.

त्याचवेळी स्वयंरोजगार, फळ-भाजी विक्रेते, वृत्तपत्रे विक्रेते, रिक्षा-टॅक्सी चालक, शेतमजूर, फेरीवाले, पशुसंवर्धन, मध गोळा करणे, मीठागरावरील कामगार, कुकुटपालन, मत्स्य प्रक्रिया व मच्छीमार, बांधकाम मजूर, विटभट्टी कमगार, मातीकाम कामगार, वाळु माती उपसा कामगार, बांधकाम रंगकाम, पीओपी कामगार, केबल टीव्ही व्यवसायीक, पथनाटय कामगार, विमा एजंट, बँक एजंट, पत्रकार, बचतगट, किरणा दुकानदार, दुधवाले, पानवाले, आशा-अंगणवाडी सेविका, घरेलू कामगार, बोट/नावेचा व्यवसाय, डिलीव्हरी बॉय, कुरियर सेवा, बस/कार / ट्रक चालक अशा विविध 300 उद्योगांमध्ये अंसघटित कामगारांची ई श्रम पोर्टल वर नोंदणी वाढविण्याकरीता स्टॉल लावण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त अंसघटित कामगारानी नोंदणी करून घ्यावी असे अवाहन उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसिलदार खालापूर आयुब तांबोळी आणि कर्जत तहसीलदार डॉ शीतल रसाळ यांनी केले आहे.

Exit mobile version