पनवेलमध्ये योजनांचा महामेळावा

। पनवेल । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधी सेवा समिती आणि पनवेल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 13 नोव्हेंबर रोजी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये विविध शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ, साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रवी पाटील उपस्थित होते.

नागरिकांना लाभदायी ठरणार्‍या 18 योजनांचे स्टॉल्स उभारण्यात आलेले असून 31 ऑक्टोबरपासून हे अभियान सुरू झाले आहे. 13 नोव्हेंबर रोजी या अभियानाची सांगता होणार असून यावेळी प्रातिनिधीक स्वरूपामध्ये लाभार्थींना वाटप केले जाणार आहे. सदरच्या कार्यक्रमासाठी मुख्य जिल्हा न्यायाधीश, श्रीमती सावंत, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त, उपस्थिती असणार आहे. नागरिकांनी या योजनांच्या महामेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी वडणे यांनी केले.

पनवेल विधी सेवा समितीच्या वतीने सर्वांना न्याय मागण्याचा अधिकार प्राप्त व्हावा या उदात्त हेतूने तळोजा कारागृहात जाऊन तब्बल 2875 कैद्यांची एका प्रश्‍नावली द्वारे मुलाखती घेऊन त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.

अ‍ॅड. मनोज भुजबळ.

पनवेल विधी सेवा समितीने आदिवासी बांधवांच्या 25 प्रमुख व्यक्तींना कायदेविषयक मार्गदर्शन केले, तसेच त्यांच्या न्याय हक्कांचे बाबत त्यांना जागृत केले व त्यांच्या साठी विशेषत्वाने असलेल्या कायद्यांची त्यांना जाणीव करून दिली. मला खात्री आहे की हे 25 आदिवासी बांधव किमान अडीच हजार आदिवासींपर्यंत हे ज्ञान पोहोचवून त्यांच्या अधिकारांची त्यांना जाणीव करून देतील.

जयराज वडणे

Exit mobile version